Maharashtra News: कोव्हिशिल्ड लसीचे दर शंभर रुपयांनी कमी!
Pckhabar – महाराष्ट्रासाठी सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर शंभर रुपयांनी कमी केले असून ही लस तीनशे रुपयांना मिळणार आहे. या लसीची किंमत चारशे रुपये होती. आदर पुनावाला यांनी स्वतः याबाबत
टि्वट करून माहिती दिली आहे.
लस उत्पादक कंपनी सिरम इंन्सिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस राज्यांना 400 रुपये तर, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळेल असं सिरमने अधिकृत घोषणा केली होती. यानंतर हे दर जास्त असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे केंद्राने भारत बायोटेक व सिरमला लसीचे दर कमी करण्याची सूचना केली होती.
आदर पुनावाला यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘राज्यांसाठी लसीचा दर प्रतिडोस 400 रुपये वरुन 300 रुपये केला जात आहे. हा निर्णय तात्काळ लगेच लागू होईल. यामुळे राज्यांचा मोठा निधी बचत होईल. तसेच, लसीकरण कार्यक्रमाला वेग येईल व अनेकांचे प्राण वाचतील.’










Leave a Reply