Pimpri Corona news: कोरोना बळींचा आकडा वाढताच, 98 जणांचा मृत्यू
2017 नवे रूग्ण, 3315 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. मृत्यूचा आकडा शंभरी गाटत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी महापालिका हद्दीत 1 हजार 956 तर हद्दीबाहेरील 61 असे 2 हजार 17 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 5 हजार 901 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 80 हजार 839 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 831 तर हद्दीबाहेरील 1 हजार 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 11 हजार 336 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 8 हजार 817 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 291 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 151 घरांना भेटी देऊन 3 हजार 733 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 333 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 46 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 3 हजार 654 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 79 पुरूष तर 29 महिला अशा 98 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस बुधवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 19 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.










Leave a Reply