‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवा’
Pckhabar- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मिडीयाद्वारे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षित अंतर ठेऊन कामकाज करायचे आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
निगडी येथील सावरकर भवन येथे दिनांक 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. तत्पुर्वी महापौर ढोरे यांनी पालिकेत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, पदाधिकारी विशाल कसबे,सचिन पारवे, सुनील भिसे उपस्थित होते.
पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात कोरोनाचे सावट संपूर्ण देशात तसेच पिपरी चिंचवड शहरात देखील आहे. आणि आण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहत्सव पदाधिकार्यांनी निर्णय घेऊन आणाभाऊंचे विचार समजापर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून या 5 दिवसाच्या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवा’










Leave a Reply