Talegaon news: नगरसेवक निखिल भगत यांच्या वतीने 750 नागरिकांचे स्व- खर्चाने लसीकरण
Pckhabar-नगरसेवक निखिल भगत यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक 1 मधील 45 वर्षांवरील 750 नागरिकांचे स्व-खर्चाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक भगत यांचे परिसरात कौतूक होत आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक भगत यांनी लसीकरण मोहिम राबविली.
मावळात तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक कोरोना रूग्ण संख्या आहे. तळेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिक कोरोनापासून सुरक्षित रहावे, नागरिकांना शासकीय रूग्णालयातील गर्दीत थांबायला लागू नये या उद्देशाने नगरसेवक निखिल भगत यांनी 45 वर्षावरील 750 नागरिकांसाठी प्रतिव्यक्ती 250 रूपये भरून स्व-खर्चाने सोमाटणे फाटा येथील पायोनियर रूग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. नगरसेवक भगत यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांबद्दल दाखविलेल्या दातृत्वाबद्दल नागरिक त्यांचे कौतूक करत आहेत.

याबाबत नगरसेवक निखिल भगत म्हणाले, ”कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्वत्र हाहाकर माजविला आहे. तळेगावातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 1 मधील 45 वर्षांवरील जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करून नागरिकांना कोरोनापासून संरक्षित करण्याचा निर्धार केला. शासकीय रूग्णालयात लसीकरणासाठी प्रचंड गर्दी असल्याने या गर्दीतही नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे प्रभागातील पात्र असलेल्या 750 नागरिकांना स्व-खर्चाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे”.
याचबरोबर नगरसेवक भगत हे सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू नागरिकांना स्व-खर्चाने ब्लड उपलब्ध करून देत आहे. तसेच प्रभागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी नगरसेवक निखिल भगत नावाने लवकरच अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेने लसीकरण नावनोंदणीसाठी नगरसेवक निखिल भगत यांच्या कार्यालयात केंद्र सुरू करण्यात आले आहे.











Leave a Reply