Pimpri news: ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास काय करावे? डॉ. कोल्हे सांगतायेत वाचा
Pckhabar- कोरोना महामारीची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांना बेड, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेक रुग्ण गृह विलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. गृह विलगीकरणामध्ये असताना रुग्णाची ऑक्सिजन पातळी अचानक खालवली जाते. अशा परिस्थितीत न घाबरता काय नेमके करावे याबाबत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘कार्प प्रोटोकॉल’ करण्याचा सल्ला दिला आहे.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या रुग्णांमध्ये 94 ते 95 एवढी ऑक्सिजनची पातळी सामान्य समजली जाते. मात्र, रुग्णांची ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा खाली येत असेल. तर, काय करावे. त्वरित डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय मदत घ्यावी. मात्र, मदत मिळेपर्यंत किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत. ‘कार्प प्रोटोकॉल’ ज्याला कोविड अवेगनिंग, रिपोजसनिंग आणि प्रोनींग असे म्हणतो. त्या ‘कार्प प्रोटोकॉल’चा वापर करून आपण रुग्णांची ऑक्सिजनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत मिळू शकते.
‘कार्प प्रोटोकॉल’ चा वापर कसा कराल
प्रथम रुग्णाला पालथे झोपवावे. मानेखाली एक उशी द्यावी. पोट ते मांडी इथपर्यंत एक ते दोन उशा ठेवाव्यात आणि पायाच्या नडगीखाली दोन उशा ठेवाव्यात. या पोजिशेनमध्ये रुग्णाला पालथे झोपवावे. रुग्णाला लागलेली थाप कमी होते का, ते पहावे. ऑक्सिजनची पातळी पुन्हा एकदा तपासून पाहावी. (परंतु, गरोदर महिला रुग्ण असेल, ह्रदयाचा, मणक्याचा काही आजार असेल. तर, पालथे झोपण्याची पोजिशेन शक्यतो टाळावी.) त्यानंतर रुग्णाला उजवा हात डोक्याखाली घेऊन उजव्या कुशीवर निस्त करावे. पुन्हा एकदा ऑक्सिजन पातळी तपासून पहावी. त्यानंतर रुग्णाला 70 अंशाच्या कोनात बसते करावे. त्यानंतर डावा हात डोक्याखाली घेऊन डाव्या कुशीवर निस्त करावे. पुन्हा रुग्णाला पालथे पोटावर झोपवावे आणि पुन्हा एकदा ऑक्सिजनची पातळी तपासून बघावी. या ‘कार्प प्रोटोकॉल’चा जर आपण योग्य वापर केला. तर, साधारण एक ते दोन लीटर पर मिनीटची ऑक्सिजनची गरज भागवता येऊ शकते.










Leave a Reply