Pimpri Corona news: कोरोनाचे 1985 नवे रूग्ण,91 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 1 हजार 985 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 91 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर 2 हजार 376 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 3 हजार 945 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 77 हजार 524 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 776 तर हद्दीबाहेरील 1 हजार 294 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 7 हजार 188 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 12 हजार 575 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 728 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 244 घरांना भेटी देऊन 3 हजार 911 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 333 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 46 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 62 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 65 पुरूष तर 26 महिला अशा 91 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस सोमवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.










Leave a Reply