Dehu News: पाणीपुरवठा समस्या दूर करा, अन्यथा आंदोलन; जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांचा इशारा
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहू परिसरामध्ये अनियमित , अवेळी ,दुषित होणाऱ्या पाणी पुरवठया संदर्भात जागतिक महिला दिनी निवेदन देऊनही अद्याप पर्यत दखल घेण्यात आली नसल्याने शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांनी ३ मे रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हाधिकारी स्मरण पत्रिकाद्वारे दिला आहे.
तीर्थक्षेत्र देहू परिसरामध्ये विठ्ठलवाडी ,माळवाडी ,देहू गावठाण परिसरात अनियमित ,अवेळी तसेच दुषित पाणी पुरवठा होत आहे. तर देहू आळंदी रोड, भीमाशंकर सोसायटी ,जिल्हा परिषद मराठी शाळे पाठीमागील भाग आणि वडाचा मळा परिसरात पाणी पुरवठयाकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे .अनेक महिलांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
राज्य शासनाने तिर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत पाणी पुरवठा योजने वर लाख्खो रूपयांचा निधी खर्चूनही वारंवार खंडित ,दुषित पाणीपुरवठा होत असल्याने समस्या निराकरण करण्यासंदर्भात जागतिक महिला दिनी ( दि८, मार्च ) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले होते . त्यानंतर पुन्हा 24 मार्च रोजी स्मरण पत्रिका दिल्यानंतरही अद्याप पर्यंत दखल न घेता कोणतेही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही .त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या खंडागळे यांनी ३ मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा स्मरण पत्रकाद्वारे दिला आहे.










Leave a Reply