Pimpri news: प्लाझ्मा दान करणार्यांना महापौर देणार एक हजार रूपये
Pckhabar- पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करणार्या नागरिकाला महापौर माई ढोरे यांनी स्वतःचे 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणार्या नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर आपल्या नावाची व रक्तगटाची नोंदणी करावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे.
शहरात कोरोन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. परंतु, प्लाझ्माचा तुटवडा असल्यामुळे तो मिळवण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना धावाधाव करावी लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक मंडळे, राजकीय कार्यकर्ते यांना रक्दान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुद्धा प्लाझ्मा दान करणार्या नागरिकाला 2 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. तर महापौर ढोरे या स्वतः एक हजार असे प्लाझ्मा दान करणाऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत.
प्लाझ्मा दान करण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावे यासाठी आता महापौर माई ढोरे यांनी स्वतःजवळचे पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्लाझ्मा दान करणार्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असणार्या नागरिकांनी 9595150505, 9049613700 किंवा 9527425202 या तीन मोबाईल नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवर स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, रक्तगट व पत्ता व्हॉट्सअप करावे, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे.










Leave a Reply