Pimpri Corona news: गुड न्युज! आज कोरोना रूग्ण संख्येपेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज
1327 नवे रुग्ण, 2 हजार 469 जणांना डिस्चार्ज, 93 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी कोरोना रूग्ण चांगलीच कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळासा असला तरी मृत्यूचा आकडी कमी होत नाही. सोमवारी 93 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका हद्दीत 1 हजार 179 तर हद्दीबाहेरील 34 असे 1 हजार 327 नवे रूग्ण सापडले आहेत. तर 2 हजार 469 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 1 हजार 960 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 75 हजार 148 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 723 तर हद्दीबाहेरील 1 हजार 256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 7 हजार 923 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 192 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 9 हजार 100 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 257 घरांना भेटी देऊन 4 हजार 251 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 320 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 59 करण्यात आले आहेत. शहरात 2 लाख 90 हजार 06 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 63 पुरूष तर 30 महिला अशा 93 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस सोमवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 20 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.










Leave a Reply