Talegaon news: युवा उद्योजक रणजित काकडे यांचा ‘ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन’तर्फे सन्मान
Pckhabar- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल युवा उद्योजक रणजित रामदास काकडे यांचा ‘ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन’तर्फे सन्मान करण्यात आला.
नवी दिल्लीतून ऑनलाइन माध्यमातून हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाँडेचरीचे राज्यपाल इकबाल सिंह, सिक्कीमचे माजी राज्यपाल बी.पी. सिंह, वाल्मिक प्रसाद सिंह, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संग्राम पटनाईक, दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील तथा न्याय मंडळाचे सदस्य पी.ए. खान यावेळी ऑनलाइन सहभागी झाले होते.
युवा उद्योजक रणजित काकडे हे आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पायाभूत सुविधांची विकासकामे उच्च दर्जा आणि निश्चित वेळेत पूर्ण केले. याची दखल घेत काकडे यांचा ‘ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन’तर्फे सन्मान करण्यात आला.










Leave a Reply