Pimpri Corona news: रूग्ण घटले, मृत्यू वाढले
94 जणांचा मृत्यू, 2 हजार 293 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या थोडीफार कमी झाली असतानाच मृत्यूचे मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारअखेर शहरात कोरोना रूग्ण संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर 50-55 मध्ये असणारा आकडा रविवारी तब्बल 94 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका हद्दीत 2 हजार 265 तर हद्दीबाहेरील 28 असे 2 हजार 293 नवे रूग्ण सापडले आहेत. तर 2 हजार 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 667 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 72 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 669 तर हद्दीबाहेरील 1 हजार 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 583 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 800 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 8 हजार 662 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 230 घरांना भेटी देऊन 3 हजार 948 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 330 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 46 करण्यात आले आहेत. शहरात 2 लाख 84 हजार 248 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 61 पुरूष तर 33 महिला अशा 94 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस रविवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Pimpri Corona news: रूग्ण घटले, मृत्यू वाढले










Leave a Reply