Maharashtra News: सर्व नागरिकांना मोफत लस
Pckhabar- महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज (रविवार) दिली.
देशात 1 मे पासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार, केरळ आणि छत्तीसगड राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही सर्वांना मोफत लस देणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.










Leave a Reply