Dehu news : देहूगाव कोविड सेंटरसाठी १०० ॲन्टीजेन टेस्टिंग किट भेट
Pckhabar- देहूगाव येथील कोविड सेंटरसाठी माजी उपसरपंच संतोष हगवणे आणि सागर हगवणे यांच्या वतीने १०० ॲन्टीजेन टेस्टिंग किट भेट देण्यात आले.
हे किट देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी स्विकारले. याप्रसंगी
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे , सागर मसुडगे, अजित काळोखे उपस्थित होते..
देहूगाव, माळवाडी, विठ्ठलवाडी, आदी परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. परिसरात दररोज 40 ते 50 नवे रुग्ण आढळून येत आहेत. देहूगावाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज 100 पेक्षा अधिक नागरिकांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी टेस्ट किट संपल्यामुळे चाचणी बंद करण्यात आली होती. याची माहिती मिळताच माजी उपसरपंच संतोष हगवणे आणि सागर हगवणे यांच्या वतीने 16 हजार रुपये किंमतीचे १०० ॲन्टीजेन टेस्टिंग किट कोविड सेंटरला भेट देण्यात आले.
याबाबत देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले ” देहूगाव परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज 100 ते 125 नागरिकांची
ॲन्टीजेन चाचणी केली जात असून 40 ते 45 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी ॲन्टीजेन टेस्टिंग किट संपल्यामुळे चाचणी बंद करण्यात आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर
माजी उपसरपंच संतोष हगवणे आणि सागर हगवणे यांच्या वतीने 16 हजार रुपये किंमतीचे १०० ॲन्टीजेन टेस्टिंग किट कोविड सेंटरला भेट देण्यात आले. त्याबद्दल त्यांचे कोविड सेंटरच्या वतीने आभारी आहोत.”










Leave a Reply