Talegaon News: यशवंत प्रतिष्ठानतर्फे ‘प्लाझ्मा दान करुया’ अभियान

Talegaon News: यशवंत प्रतिष्ठानतर्फे ‘प्लाझ्मा दान करुया’ अभियान
Pckhabar-  देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, साधे बेड मिळणे जिकिरीचे झाले आहे. कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दिल्याने नवसंजीवनी मिळत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ‘प्लाझ्मा दान करूया’ या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे येथील यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

रोज प्लाझमाची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे, मित्रांचे फोन येत आहेत. अशा वेळी आपल्या वतीने सहकार्याचे एक पाऊल पुढे येऊन आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना साथ देऊया. जेणे करून योग्य वेळेत गरजू रुग्णांना उपचार करण्यासाठी  प्लाजमा उपलब्ध होईल. तेव्हा प्लाजमा दान करण्यासाठी आपल्या संपर्कातील मित्रांना व नातेवाईकांना प्रेरित करूया.

अँटीबॉडीज (प्लाइमा) दाता कोण होऊ शकतो?

कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावे.

कमीत कमी 50 किलो वजन असणे आवश्यक आहे.

त्याला आधी कोरोना संक्रमण झालेले असावे.

कोरोना संक्रमणातून बरे होऊन १४ दिवस पूर्ण झाले असावेत. स्वास्थ्य व शरीर प्रकृती चांगली असणे आवश्यक आहे.

त्या व्यक्तीस दुसरे कोणतेही जिवाणू, विषाणूजन्य संक्रमण उदा. (HIV Hepatitis) झालेले नसावे.

तो रक्तदानास तयार असावा.

आम्ही आपणास प्लाझ्मा उपलब्ध होण्यास मदत करू शकतो. कृपया आपणही प्लाइमा दान करून या कार्यास हातभार लावावा.

प्लाइमा दान करण्यासाठी खालील व्हाट्सअप क्रमांकावर आपले नाव, मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, मेसेज करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क

संविद पाटील: 9766607299
निलेश इखे 8180002469
संजय कदम: 8796216551
सचिन मोने: 9604970799
शंकर सावळे 9272328113 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *