Pimpri Corona news: सलग दुसर्‍या दिवशी मृत्यूच्या प्रमाणात वाढ

Pimpri Corona news: सलग दुसर्‍या दिवशी मृत्यूच्या प्रमाणात वाढ
81 जणांचा मृत्यू, 2 हजार 603 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या थोडीफार कमी झाली असतानाच मृत्यूचे मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. 50-55 मध्ये असणारा आकडा शनिवारी तब्बल 81 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  महापालिका हद्दीत 2 हजार 473 तर हद्दीबाहेरील 130 असे 2 हजार 603  नवे रूग्ण सापडले आहेत. तर 1 हजार 417 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 98 हजार 402 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 70 हजार 652 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 610 तर हद्दीबाहेरील 1 हजार 182 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 9 हजार 4  संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 6 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 8 हजार 144 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 366  घरांना भेटी देऊन 4 हजार 261 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 330 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 46 करण्यात आले आहेत. शहरात 2 लाख 77 हजार 380 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 57 पुरूष तर 24 महिला अशा 81 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस शनिवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *