Pckhabar : राज्यातील कोविडच वाढता प्रादुर्भाव पाहता शिरूर लोकसभा मतदार संघातील वैद्यकीय सेवेचा आढावा घेत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यास खासदार अमोल कोल्हे यांनी आळंदी दौरा केला. यावेळी त्यांनी आळंदीतील कोविड केअर सेंटरच्या कामाची माहिती घेत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात या प्रसंगी डॉ. शुभांगी नरवडे, डॉ. श्रीनिवास कोलड, रुग्ण दक्षता समितीचे सदस्य माजी नगरसेवक डी.डी.भोसले, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कुर्हाडे, माजी नगराध्यक्ष बबन कुर्हाडे आदी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयातील कामाची आरोग्य सेवेची माहिती घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. येथील एमआयटी महाविध्यालयात कोविड केअर सेंटर विकसित करण्यात येत आहे.या कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आळंदीत आरोग्य सेवा प्रभावी व सक्षम राहील याची दक्षता घेत आरोग्य सेवेस सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.
‘आळंदीतील कोविड केअर सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य करणार’










Leave a Reply