Pimpri news: जम्बो कोविड सेंटरमधील वार्डात जावून उपमहापौर हिराबाई घुले यांच्याकडून रुग्णांची विचारपूस
ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयाची उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी आज (गुरुवारी) पाहणी केली. आयसीयू व इतर वाॅर्डातील रुग्णांशी संवाद साधला. उपचार व्यवस्थित केले जातात का, जेवण पुरेसे आणि पौष्टिक असते का याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाता कामा नये, रुग्णाच्या प्रकृतीची नातेवाईकांना माहिती वेळोवेळी द्यावी. ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका, अशा सूचना उपमहापौर घुले यांनी रुग्णालय प्रशासनाला केल्या.
नेहरूनगर येथे पीएमआरडीएच्या वतीने 800 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. महापालिकेमार्फत हे रुग्णालय चालविले जाते. याठिकाणी 650 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. जम्बो कोविड रुग्णालयाबाबतीत काही तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उपमहापौर घुले यांनी जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली.
उपमहापौर घुले यांनी आयसीयू, ओ टू, व इतर वाॅर्डातील रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. औषध उपचार, जेवन, त्याचा दर्जा याबाबत विचारणा केली. रुग्णांना औषधांची, इंजेक्शनची कमतरता भासू देऊ नका, रुग्णांची व्यवस्थित काळजी घ्यावी. ऑक्सिजनचा तुटवडा जाणून देऊ नका, ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करावेत. जम्बो कोविड सेंटरबाबत रुग्णामध्ये अधिक विश्वास निर्माण झाला पाहिजे. या पद्धतीने रुग्णांची काळजी घ्यावी. रुग्णाच्या प्रकृतीची नातेवाईकांना वेळोवेळी माहिती द्यावी, अशा सूचना उपमहापौर घुले यांनी जम्बोचे संबंधित अधिकारी, डॉक्टरांना दिल्या.
त्यावर रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. औषधे, इंजेक्शनची कमतरता भासू दिली जात नाही. योग्य पध्दतीने उपचार केले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.










Leave a Reply