Pimpri Corona news: 54 जणांचा मृत्यू, 2 हजार 588 नवे रुग्ण, 2156 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 539 आणि महापालिका हद्दीबाहेरील 49 अशा 2 हजार 588 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, 54 जणांचा मृत्यू झाला आहे. 2156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 1 लाख 93 हजार 512 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 67 हजार 402 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2508 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 1113 अशा 3621 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.
सध्या 8 हजार 254 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 6 हजार 444 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 33 हजार 935 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply