Maharashtra News : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता

ही बातमी शेअर करा.

Maharashtra News : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता
Pckhabar- राज्यात कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे गरजेचा आहे. आज मंगळवार झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी लाॅकडाऊन लावण्यास समर्थन केले आहे. त्यामुळेच राज्यात  15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला.  बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन लावण्याची मागणी सर्व मंत्र्यांनी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


ही बातमी शेअर करा.