Pimpri Corona news: 54 जणांचा मृत्यू, 2 हजार 427 नवे रूग्ण

Pimpri Corona news: 54 जणांचा मृत्यू, 2 हजार 427 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या थोडीफार कमी झाली असतानाच मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच आहे. तीन हजारांच्या आसपास असणारी संख्या पुन्हा अडीच हजारांच्या आत आली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी शहरात 2 हजार 279 तर हद्दीबाहेरील 148 असे 2 हजार 427 नवे रूग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी तब्बल 54 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 980 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 86 हजार 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 60 हजार 664 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 212 तर हद्दीबाहेरील 1 हजार 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 8 हजार 723 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 793 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 4 हजार 901 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 456 घरांना भेटी देऊन 4 हजार 769 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 312 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 450 करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या दहा दिवसात 423 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सोमवारी आणखी 54 जणांचा यामध्ये समावेश झाला आहे.   29 पुरूष तर 25  महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *