Pimpri news: जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका!

Pimpri news: जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका!
दहा दिवसात कोरोनाने 423 रुग्ण दगावले
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजविला असून रुग्णसंख्येबरोबच मृत्यूचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे. रुग्णांना
आयसीयू, व्हेंटिलेटरच्या खाटा मिळत नाहीत. वेळेवर उपचार मिळत नसल्याने
रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळेच
अवघ्या दहा दिवसात 423 रुग्ण दगावले आहेत.

शहरात गतवर्षापेक्षा यंदा दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. कोरोनाबाधित रूग्णांची संख्याही प्रचंड वाढत आहे. महापालिका रूग्णालय, कोविड सेंटर फुल्ल झाली असून खासगी दवाखान्यामध्येही जागा कमी पडत आहे. बेशिस्त नागरिकांमुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णांना वेळेवर खाट मिळणे कठिण होत आहे. आयसीयू, व्हेंटिलेटरच्या खाटा मिळत नाहीत. त्यामुळे आयसीयू उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. याच कारणामुळे कमी वयाचे रुग्ण दगावत आहेत. शहरातील पिंपळे गुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

वेळेत उपचार न मिळाल्यामुळे 25, 30, 35, 40 या वयोगटातील रुग्णांचाही मृत्यू होत आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती जात असल्याने ही बाब चिंताजनक आहे. गेल्या दहा दिवसात 423 जण दगावले आहेत. 9 एप्रिल रोजी 23 जण, 10 एप्रिल 28, 11 एप्रिल 30, 12 एप्रिल 34, 13 एप्रिल 41, 14 एप्रिल 45, 15 एप्रिल सर्वाधिक 61 रुग्ण दगावले, 16 एप्रिल 54, 17 एप्रिल 54 आणि 18 एप्रिल रोजी 53 असे 423 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *