Dehu News: ऑनलाइन अध्यापनासाठी उपशिक्षिका अश्विनी आडकर यांनी सुरू केले यूट्यूब चॅनेल; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या अश्विनी दिपक आडकर यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्यासाठी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. या चैनल विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
त्यांच्या चैनलचे नाव ‘Scholarly Enhance The Learning’ विद्यार्थ्यांना शाळेतच बसून शिकल्यासारखे वाटावे म्हणून, त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने वेगवेगळे घटक व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न मी या चॅनेल द्वारे केला आहे.
यात सर्व शैक्षणिक व्हिडिओ असून पुढील विषयांवर आधारित माहितीचा त्यात समावेश आहे.
1. इयत्ता पाचवी ते दहावी अभ्यासक्रम सर्व विषय
2.मराठी, हिंदी, इंग्रजी व्याकरण 3. शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा यासाठी उपयुक्त माहिती
4. प्रश्नावली, quiz -contest , इत्यादी . एक रयत सेवक म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करते. आपण सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे. चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी त्याची लिंक खाली देत आहे, कृपया ही लिंक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचवा . https://www.youtube.com/channel/UCXXNUi84AD1DiOf0rpFjK1g







Leave a Reply