Pimpri Corona news: 54 जणांचा मृत्यू, 3 हजार 136 नवे रूग्ण

Pimpri Corona news: 54 जणांचा मृत्यू, 3 हजार 136 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या पुन्हा तीन हजारच्या पुढे गेली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारी शहरात 2 हजार 982 तर हद्दीबाहेरील 154 असे 3 हजार 136 नवे रूग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी तब्बल 54 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 756 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 80 हजार 916 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 56 हजार 366 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 249 तर हद्दीबाहेरील 1002 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 11 हजार 674 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 12 हजार 694 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 3 हजार 888 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 207 घरांना भेटी देऊन 4 हजार 79 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 303 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 595 करण्यात आले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये 40 पुरूष तर 14 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *