Pimpri news: शहरात आज 2710 नवीन रुग्णांची नोंद; 54 मृत्यू, 2872 जणांना डिस्चार्ज

Pimpri news: शहरात आज 2710 नवीन रुग्णांची नोंद; 54 मृत्यू, 2872 जणांना डिस्चार्ज
Pckhabar – गेल्या पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बळींचे प्रमाण वाढत आहे. आज  (शुक्रवारी) 54 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद माहिती महापालिकेकडे झाली आहे. तर, शहराच्या विविध भागातील 2 हजार 529 आणि महापालिका हद्दीबाहेरील 181 अशा 2 हजार 710 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2872 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 77 हजार 934 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 53 हजार 610 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2317 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 980 अशा 3297 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 7 हजार 22 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 7 हजार 860 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 87 हजार 726 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *