Maval News : मोफत रुग्णवाहिकेची अखंडपणे सेवा सुरु
आमदार सुनिल शेळके यांच्यातर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा
Pckhabar-कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, सामग्री, मनुष्यबळ किती आवश्यक आहे, हे आपण मागील वर्षभरापासून अनुभवत आहोत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यापासून ते वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी उपाययोजना करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत.मावळ तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने ‘मोफत रुग्णवाहिका सेवा’ हा सातत्यपूर्ण उपक्रम सुरु ठेवला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील रुग्णांना अडचणीच्या प्रसंगात तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने ‘मोफत रुग्णवाहिका सेवा’ अखंडपणे सुरु आहे. संकटसमयी आपत्कालीन सुविधेसह इतर रुग्णांनाही या रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळाला. रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम या रुग्णवाहिकांमुळे शक्य झाले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात या जीवनवाहिनीचा मोलाचा वाटा राहिला. ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरु राहील, असेही आमदार शेळके यांनी म्हटले आहे.







Leave a Reply