Pimpri news: धक्कादायक… कोरोनामुळे 61 मृत्यू; 2128 नवीन रुग्णांची नोंद

Pimpri news: धक्कादायक… कोरोनामुळे 61 मृत्यू; 2128 नवीन रुग्णांची नोंद
Pckhabar- मागील चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बळींचे प्रमाण वाढत आहे. आज  (गुरूवारी) तब्बल 61 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद माहिती महापालिकेकडे झाली आहे. तर, शहराच्या विविध भागातील 2 हजार 86 आणि महापालिका हद्दीबाहेरील 42 अशा 2 हजार 128 नवीन रुग्णांची नोंद झाली.  2110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 36 आणि महापालिका हद्दीबाहेरील 25 अशा 61 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 36 पुरुष आणि 25 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 75 हजार 405 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 50 हजार 738 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2285 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 958 अशा 3243 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 6545 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *