Pimpri Corona news: सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा चिंताजनक, 45 मृत्यू

Pimpri Corona news: सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा चिंताजनक, 45 मृत्यू

शहरात आज 1606 नवीन रुग्णांची नोंद; 3352 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बळींची संख्या वाढत आहे. तब्बल 45 जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 517 आणि महापालिका हद्दीबाहेरील 89 अशा 1 हजार 606 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 73 हजार 319 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 48 हजार 628 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2249 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 933 अशा 3182 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6136 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 5189 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 384 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3352 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 26 आणि महापालिका हद्दीबाहेरील 19 अशा 45 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 26 पुरुष आणि 19 महिला रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *