Pimpri news: शहरातील आठ केंद्रावर लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास सुरुवात

Pimpri news: शहरातील आठ केंद्रावर लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास सुरुवात
Pckhabar-कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. 14 ते 18 एप्रिल या कालावधीत महापालिकेच्या आठ केंद्रांवर लसीचा दुसरा डोस  देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी आठ केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.

आय हॉस्पिटल मसुळकर कॉलनी आणि वायसीएमएच, जुन्या भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा,  तालेरा हॉस्पिटल, चिंचवड,  ईएसआयएस हॉस्पिटल, मोहन नगर चिंचवड, यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय यमुनानगर,  पिंपळेगुरव येथील महापालिका रुग्णालयाजवळील पीसीएमसी शाळा,  पिंपळेनिलख दवाखाना, आणि पिंपरीतील नवीन जिजामाता हॉस्पिटल येथे आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *