Pimpri Corona news: अबब.. एकाच दिवशी 41 जणांचा बळी, 1841 नवे रूग्ण, 2 हजार 812 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: अबब.. एकाच दिवशी 41 जणांचा बळी, 1841 नवे रूग्ण, 2 हजार 812 जणांना डिस्चार्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या थोडीफार कमी झाली असतानाच मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतच आहे. तीन हजारांच्या आसपास असणारी संख्या गेल्या पाच-सहा दिवसापासून दोन हजार ते अडीच हजारांच्या आत आली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी शहरात 1 हजार 838 तर हद्दीबाहेरील 3 असे 1841 नवे रूग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी तब्बल 41 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 812 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 71 हजार 802 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 45 हजार 276 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 223 तर हद्दीबाहेरील 914 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 10 हजार 265 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 728 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 4 हजार 213 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 231 घरांना भेटी देऊन 3 हजार 934 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 292 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 274 करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवशी 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 पुरूष तर 17 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *