Pimpri Corona news: मृत्यूचे प्रमाण वाढले, रूग्ण घटले
34 जणांचा मृत्यू, 2 हजार 221 नवे रूग्ण, 2 हजार 439 जणांना डिस्चार्ज
पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या थोडीफार कमी झाली असतानाच मृत्यूचे प्रमाण मात्र वाढले आहे. तीन हजारांच्या आसपास असणारी संख्या गेल्या चार पाच दिवसात अडीच हजारांच्या आत आली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी शहरात 2 हजार 188 तर हद्दीबाहेरील 33 असे 2221 नवे रूग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी तब्बल 34 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 69 हजार 964 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 42 हजार 464 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 198 तर हद्दीबाहेरील 898 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 10 हजार 538 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 9 हजार 17 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 514 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 172 घरांना भेटी देऊन 3 हजार 773 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 301 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 74 करण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांनंतर प्रथमच एकाच दिवशी 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 17 पुरूष तर 17 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
Pimpri Corona news: मृत्यूचे प्रमाण वाढले, रूग्ण घटले










Leave a Reply