Bhosari news: महापालिका ‘कोविड- 19 वॉर रुम’ला आमदार महेश लांडगे यांची भेट

Bhosari news: महापालिका ‘कोविड- 19 वॉर रुम’ला आमदार महेश लांडगे यांची भेट
Pckhabar- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी सोमवारी महापालिका ‘कोविड- 19 वॉर रुम’ला दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. शहरात १०० व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, खासगी रुग्णालयांतील ‘बेड’ अधिगृतीत करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे कोरोना महामारीचा सामना करीत आहेत. शहरात व्हेंटिलेटर, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्हेंटिलेटर बेड उपलब्ध कराव्या. तसेच, विभागीय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे रुग्णालयांमध्येच रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावेत. त्याची अंमलबजावणी काठेकोरपणे व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *