Lonavala news:कोरोना नियमांचे उल्लंघन ; भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
Pckhabar- कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत दुकाने उघडी ठेवत गर्दी जमविणारे 8 व्यावसायिक व भाजपा वर्धापनदिनाच्या निमित्त महिलांचे क्रिकेट सामने भरविल्याप्रकरणी लोणावळा शहर भाजपा पदाधिकाऱ्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी भादंवि कलम 188, 269 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली .
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत . तसेच पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र येण्यास मनाई असताना देखील जयचंद चौक येथील वंडरफिट हे दुकाने खुले ठेवत विनामास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी जमविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अमोल वासुदेव मुंजे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . तसेच मावळा पुतळा चौकातील मॉर्डन कपडे शॉपीचे भाविन महेंद्र कपाडिया , हार्डवेअर व्यावसायिक सल्वारज नाडार , हार्डवेअर व्यावसायिक धनराज चुन्नीलाल ओसवाल , हार्डवेअर व्यावसायिक खोजेमा सैफुद्दिन रामपुरवाला , छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक मनिष शिवरतन अगरवाल , भांगरवाडी येथील मोबाईल रिपेअरिंग दुकानदार सुबिर चक्रवर्ती व दुकानदार चेतनकुमार गोकूळचंद जैन या 8 जणांच्या विरोधात ही कारवाई केली आहे . तसेच भाजपाच्या वर्धापनदिनी नियमांचे उल्लंघन करत बोहरी ग्राउंड येथे क्रिकेटचे सामने भरविल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्यासह शुभम मानकामे, श्रवण चिकणे, विजय सकट या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे .
सर्व दुकानदारांनी शासन आदेशाचे उल्लंघन करत त्यांच्या दुकानात गर्दी करण्यास प्रतिबंध आहे हे माहित असताना देखील विनामास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करताना मिळून आल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले . याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास कदम व प्रविण तायडे यांनी फिर्याद दिल्या आहेत .










Leave a Reply