Pimpri Corona news: कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू, 2 हजार 72 नवे रूग्ण, 1 हजार 824 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून शुक्रवारी शहरात 2 हजार 9 तर हद्दीबाहेरील 63 असे 2072 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी तब्बल 23 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 63 हजार 128 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 35 हजार 663 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 139तर हद्दीबाहेरील 865 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 8 हजार 169 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 615 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 3 हजार 570 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 186 घरांना भेटी देऊन 3 हजार 707 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 295 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 263 करण्यात आले आहेत.










Leave a Reply