Pimpri news: जान है तो जहान है !
नागरिकांनो काळजी घ्या, कोरोना रूग्णांना बेड मिळत नाहीत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात दररोज तीन हजारच्या आसपास कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहे. त्यामुळे महापालिकेची सर्व रूग्णालय रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिवावर उदार न होता स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
शहरात 1 लाख 55 हजार 984 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 30 हजार 129 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 94 तर हद्दीबाहेरील 850 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्वच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्यातील विविध भागातील व्यापारी लॉकडाऊनला तीव्र विरोध करत सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. या लॉकडाऊनला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, हातावर पोट असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अर्थव्यवस्था डबगाईला आली आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. मात्र, लॉकडाऊन करणे जरी चुकीचे असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे. आणि आजच्या घडीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.
शहरातील वाढती रूग्ण संख्येमुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील कोरोना रूग्णासांठी असलेले बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे
आज बुधवारी रूग्णालयाबाहेर पेंडॉल टाकून कोरोना रुग्णांना बेड टाकण्यात आले आहेत. तसेच रूग्णांना तेथेच ऑक्सिजन देखील लावण्यात आला आहे.

कोरोनाचे रूग्ण दररोज वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पुर्णपणे कोलमडण्यापुर्वीच काही कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. त्यानुसारच सरकारने लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला आहे. नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भुलथापांना बळी न पडता लॉकडाऊनला विरोध करू नये. तसेच स्वतःही मास्क, सोशल डिस्टसींग, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टींचे पालन करणे गजरेचे आहे. शेवटी जान है तो जहान है!







Leave a Reply