Dehu news: देहू भाजपच्या मागणीला यश; कोविड सेंटर सुरू

Dehu news: देहू भाजपच्या मागणीला यश; कोविड सेंटर सुरू
Pckhabar- वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता बंद झालेले कोविड सेंटर पुन्हा चालू करावे, अशी मागणी देहू भाजपतर्फे करण्यात आली होती. या मागणीची प्रशासनाने त्वरित दखल घेत अद्यावत कोविड सेंटर सोमवारपासून देहू नगरीतील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याबद्दल
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि देहू नगरपंचायत प्रशासक मधुसूदन बर्गे यांचे भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी आभार मानले आहेत.

श्रीक्षेत्र देहूमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण वाढ होत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नव्हती. सर्वच रूग्णालय तुडूंब भरली आहेत. यामुळे नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहेत. यामुळे नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे देहूगाव येथील भक्त निवास येथील बंद केलेले कोविड सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी मच्छिंद्र परंडवाल यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *