Pimpri Corona news: शहरात 2 हजार 196 नवीन रुग्णांची नोंद; 16 मृत्यू

Pimpri Corona news: शहरात 2 हजार 196 नवीन रुग्णांची नोंद; 16 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2152 आणि महापालिका हद्दीबाहेरील 44 अशा 2 हजार 196 नवीन रुग्णांची सोमवारी नोंद झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1815 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 14 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 16 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 10 पुरुष आणि 6 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 53 हजार 80 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 28 हजार 450 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2079 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 848 अशा 2927 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3804 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1055 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 98 हजार 784 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 15 हजार 391 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *