Dehu news : देहूगावात कोविड सेंटर तत्काळ सुरू करा: मच्छिंद्र परंडवाल

Dehu news : देहूगावात कोविड सेंटर तत्काळ सुरू करा: मच्छिंद्र परंडवाल
Pckhabar-श्रीक्षेत्र देहूमध्ये सातत्याने कोरोणा रुग्ण वाढ होत आहे. नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. सर्वच रूग्णालय तुडूंब भरली आहेत. यामुळे नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. अश्या परिस्थिती बंद झालेले कोविड सेंटर पुन्हा चालू करावे, अशी मागणी देहू भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी देहू नगर पंचायतचे प्रशासक मधुसूदन बर्गे यांच्याकडे केली आहे.

याबाबत परंडवाल यांनी प्रशासक बर्गे यांना निवेदन दिले आहे.

पुणे जिल्ह्यासह देहूगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिसरातील सरकारी रूग्णालयासह खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहेत. यामुळे नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे देहूगाव येथील भक्त निवास येथील बंद केलेले कोविड सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी मच्छिंद्र परंडवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *