Pimpri Corona news: धोका वाढतोय, नागरिकांनो बेफिकीर होऊ नका, 2905 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 10 दिवसांपासून शहरात दिड हजारच्या पुढे वाढणारी रूग्ण संख्या आता तीन हजाराच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून शनिवारी शहरात 2 हजार 832 तर हद्दीबाहेरील 73 असे 2905 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 47 हजार 546 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 24 हजार 844 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 49 तर हद्दीबाहेरील 844 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 5 हजार 981 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 402 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 293 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 326 घरांना भेटी देऊन 4 हजार 670 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 254 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 646 करण्यात आले आहेत. शनिवारअखेर 1 लाख 74 हजार 786 लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply