Chikhali crime news: दुधामधून औषध देऊन विवाहितेचा तीनवेळा गर्भपात
Pckhabar-दुधाचा व्यावसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला दुधामधून ए केअर नावाचे औषध देऊन तीनवेळा गर्भपात करून त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच त्यांच्या आई-वडिलांना मारहाण करून अपमानित करून विवाहितेला नांदवण्यास नकार दिला. हा प्रकार जाधववाडी येथे घडला. याप्रकरणी सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती महेश सुरेश दळवी, सासू रत्ना सुरेश दळवी, सासरे सुरेश मारूती दळवी, दिर संदीप सुरेश दळवी, नणंद सुजाता सदानंद निकम, नंदावा सदानंद बापुसाहेब निकम, मावस दिर शैलेश लोणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाचा व्यावसाय करण्यासाठी फिर्यादी यांना माहेराहून पैसे आणण्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. त्यांना दुधामधून ए केअर नावाच्या गोळ्या देऊन तीनवेळा गर्भपात केला. त्यांच्या आई-वडिलांना हाताने मारहाण करून त्यांना अपमानित केले. फिर्यादी यांना नांदवण्यास नकार दिला. फौजदार देशमुख तपास करत आहेत.
Chikhali crime news: दुधामधून औषध देऊन विवाहितेचा तीनवेळा गर्भपात










Leave a Reply