Bhosari crime news: गावगुंडाची दादागिरी, तरूणाला जबर मारहाण
Pckhabar- मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जाणार्या तरूणाने रस्त्याच्या मध्येच दोन टॅक्टर लावून बोलत थांबलेल्या चालकांना हार्न वाजविला. त्यामुळे चिडलेल्या ट्रॅक्टर चालकांनी आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघून घेऊ अशी धमकी देऊन लोखंडी रॉड, लाकडी दाडक्याने जबर मारहाण केली. ही घटना जाधववाडी येथे घडली.
रामकृपाल धुरणसिंग मरकाम (वय-25), शुभम सुरेश बोराटे (वय-27, रा. जाधववाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रूपेश दिगंबर यादव (वय-27, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रूपेश मेडिकलमधून औषधे आणण्यासाठी दुचाकीवरून जात होता. जाधववाडीतील ऐश्वर्या हमारा सोसायटीसमोर आरोपी हे दोन ट्रॅक्कर घेऊन रस्त्याच्या मध्येच बोलत थांबले होते. फिर्यादी यांनी हॉर्न वाजवत ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी रूपेशला शिवीगाळ करत आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी देत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच दुचाकीचे नुकसान केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
Bhosari crime news: गावगुंडाची दादागिरी, तरूणाला जबर मारहाण










Leave a Reply