Pimpri Corona news: कोरोनाचा उद्रेक, 2499 नवे रूग्ण, 19 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 10 दिवसांपासून शहरात दिड हजारच्या पुढे वाढणारी रूग्ण संख्या आता अडीच हजाराच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून आज (शनिवार) पासून मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी शहरात 2 हजार 463 तर हद्दीबाहेरील 36 असे 2499 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 507 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 44 हजार 714 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 22 हजार 990 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 34 तर हद्दीबाहेरील 842 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 7 हजार 893 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 5 हजार 969 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 546 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 235 घरांना भेटी देऊन 3 हजार 971 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 245 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 646 करण्यात आले आहेत. शुक्रवारअखेर 1 लाख 59 हजार 932 लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply