Pune news : … तर अजित पवार यांनी फोन केला तरी बेड मिळायचा नाही!

 

Pune news : … तर अजित पवार यांनी फोन केला तरी बेड मिळायचा नाही!
Pckhabar- पुण्यात लॉकडाऊन नको अशी लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. ते म्हणाले “मी पण लॉकडाऊनच्या विरोधात आहे. पण संख्या ज्या पध्दतीने वाढते. त्या पद्धतीने शंभर टक्के हाॅस्पिटल ताब्यात घेतले तरी बेड मिळने कठीण आहे. लोक ऐकतच नाहीत. कडक निर्बंध घातले तरी. पोलिस, आयुक्त निर्बंध पडतात. एखाद्या घरात कोरोना रूग्ण असेल तरी. त्या घरातील इतर लोक गाव भर फिरतात. काही उपयोग होत नाही. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. त्या वेळी काय करणार?” असा उद्विग्न सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित केला.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल शुक्रवार सुरू आहे. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

पुण्यात लॉक डाऊन नाही. परंतु कठोर निर्बंध घातले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी राहणार. ८ वाजेनंतर सर्व हॉटेल्स, दुकाने बंद करण्याबाबत पालक मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *