Dehu news: प्रगतशील शेतकरी गोविंद हगवणे यांचा ‘कृषी पुरस्काराने’ सन्मान

 

Dehu news: प्रगतशील शेतकरी गोविंद हगवणे यांचा ‘कृषी पुरस्काराने’ सन्मान
Pckhabar- देहू शहर भाजपच्या वतीने देहू नगरीमधील प्रगतशील शेतकरी गोविंद आप्पा हगवणे यांचा कृषी पुरस्काराने गुरुवारी सन्मानित करण्यात आले.

हगवणे यांना माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपस्थित पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, कृषी अधिकारी मनिषा शिरसाट, मावळ तालुका भाजपचे सरचिटणीस सुनील चव्हाण, देहू माळवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, उपाध्यक्ष भाजप पुणे जिल्हा बाळासाहेब काळोखे, देहू शहर भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल , संत सेवक जालिंदर महाराज काळोखे, देहू शिवसेना शहर प्रमुख सुनील हगवणे, सोसायटी संचालक राजेंद्र काटे, व्हाईस चेअरमन तात्या पचपिंड, देहू शहर भाजप उपाध्यक्ष सचिन काळोखे, देहू शहर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस गणेश खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हगवणे, प्रकाश मोरे, उमेश शिंदे, सोमा शेळके, संजय जंबुकर, अक्षय हगवणे, माऊली हगवणे, संतोष चव्हाण, सागर मुसुडगे, संभाजी बाळसराफ, सागर हगवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अभिमन्यू काळोखे यांनी अभिनंदन केले. तसेच आप्पा यांचा उल्लेख निष्ठावान अणि शेती विषयक प्रेम असणारे व्यक्तिमत्त्व असा केला.

माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे यांनी आप्पांचे कौतुक करून कृषी विधेयक काय आहे हे दृष्टीक्षेप करून दिला. बाळा भाऊ यांना आप्पा, प्रविण हगवणे, हिरामण हगवणे यांच्या वतीने शेतात झालेला बटाटा भेट दिला.

आगामी काळात कृषि धोरण अजुन मजबूत करण्यासाठी कायम साथ राहील अशी ग्वाही माजी मंत्री बाळा भाऊ यांनी दिली.

माजी उपसरपंच संतोष हगवणे यांनी प्रास्ताविक केले. देहू शहर प्रमुख सुनील भाऊ यांनी शुभेच्छा देत उपस्थित सर्वाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *