Pimpri Corona news: कोरोनाचा कहर सुरूच, शहरात 2137 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गुरूवारी शहरात 2 हजार 113 तर हद्दीबाहेरील 24 असे 2137 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 161 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 42 हजार 251 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 21 हजार 483 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 18 तर हद्दीबाहेरील 839 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरूवारी 4 हजार 464 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 995 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 85 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 269 घरांना भेटी देऊन 4 हजार 256 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply