Pimpri news: अवैध धंद्यांना अभय देणार्या पोलीस अधिकार्यांची उचलबांगडी होणार
Pckhabar- शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा पथक आणि पोलीस ठाण्याकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. काही अधिकारी अवैध धंद्यांना अभय देण्याचे काम करत असून या अधिकार्यांची कुंडली काढण्याचे काम सुरु आहे. अशा अधिकार्यांची महत्वाच्या पदावरून उचलबांगडी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर 2020 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. काही दिवसातच सामाजिक सुरक्षा पथक हे कारवायांच्या जोरावर आयुक्तांच्या गळ्यातील ताईत झाले. या पथकाने सात महिन्यांच्या कालावधीत 175 पेक्षा जास्त अवैध धंद्यांवर कारवाया केल्या आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर या कारवाया झाल्या आहेत, त्या त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर आयुक्तांकडून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. पोलीस निरीक्षकांनी सामाजिक सुरक्षा विभागाबाबत केलेल्या तक्रारींवरून आयुक्तांनी पथकातील सात कर्मचार्यांची तडकाफडकी बदली केली. सामाजिक सुरक्षा विभागातून बदली केलेल्या कर्मचार्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी सामाजिक सुरक्षा विभागात काम दिले होते.
सामाजिक सुरक्षा विभाग नवनवीन कारवाया करीत आहे. त्यापैकी बहूतांश अवैध धंद्याबाबत स्थानिक अधिकार्यांनाही माहिती नव्हती. काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकास खुलासा विचारण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित पोलीस अधिकार्यांची कार्यक्षम नसल्याचे कारण देत त्यांची बदली केली जाणार असल्याचेही पोलीस कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
Pimpri news: अवैध धंद्यांना अभय देणार्या पोलीस अधिकार्यांची उचलबांगडी होणार










Leave a Reply