Talegaon News: धक्कादायक, गँस संपल्याने अंत्यसंस्कार होत असलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत

Talegaon News: धक्कादायक, गँस संपल्याने अंत्यसंस्कार होत असलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्मशानभूमीतील गँस दाहिनीच्या सिलेंडरमधील गँस अचानक संपल्याने अंत्यसंस्कार होत असलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत  सुमारे दीड ते दोन तास  पडून राहिला. दुसरा गँस सिलेंडर आणल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे नगर परिषदेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 मंगळवारी रात्री १०च्या सुमारास कोरोनामुळे मृत झालेला मृतदेह येथील गँस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता. अग्निसंस्कार चालू असतानाच गँस दाहिनीमधील सिलिंडरचा गँस संपला. त्यामुळे कामावरील कर्मचा-यांची एकच पळापळ झाली. अखेर दोन तासाने ठेकेदाराने सिलिंडर पाठविले. तसेच जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी देखील सामाजिक बांधिलकीतून सिलिंडर पाठवून दिले. व अंत्यसंस्कार पूर्ण झाले.

या प्रकारामुळे मृताचे नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक , राजकीय कार्यकर्ते यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *