Pimpri news: रुग्णांची काळजी घ्या, औषधांची कमतरता भासू देऊ नका; उपमहापौरांच्या वायसीएम रुग्णालय प्रशासनाला सूचना

Pimpri news: रुग्णांची काळजी घ्या, औषधांची कमतरता भासू देऊ नका; उपमहापौरांच्या वायसीएम रुग्णालय प्रशासनाला सूचना

उपमहापौर हिराबाई घुले यांनी केली वायसीएम रुग्णालयाची पाहणी

Pckhabar- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. रुग्णांना योग्य उपचार द्यावेत. औषधांची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच वायसीएमचा मृत्यूदर कमी राहिला आहे हे आपल्या यंत्रणेचे यश असून मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर घुले यांनी बुधवारी (दि.31) वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. कोरोना वॉर्डात जाऊन संपूर्ण माहिती घेतली. ऑक्सिजन,
व्हेटिलेटर बेड किती आहेत. याची माहिती घेतली. वायसीएमचचे अधिष्ठता डॉ. राजेश वाबळे यांनी बेड, उपाययोजनांची माहिती दिली. शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिनिधी डॉ. सतिष कांबळे, डॉ. अनिकेत मातेसोड यावेळी उपस्थित होते.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना तत्काळ बेड मिळणे आवश्यक आहे. बेड वाढवावेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना प्राध्यान्याने बेड द्यावेत. त्यांची बेडसाठी तारांबळ उडता कामा नये. त्यांना तत्काळ दाखल करून उपचार करावेत, अशा सूचनाही उपमहापौर घुले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जास्तीत-जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी. लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *