Talegaon news: मायमरमध्ये आरटीपीसीआर कोविड तपासणी उपलब्ध

Talegaon news: मायमरमध्ये आरटीपीसीआर कोविड तपासणी उपलब्ध
Pckhabar-एनएबीएल प्रमाणीत आर टी पी सी आर कोविड तपासणी सुविधा मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) रूग्णालयाच्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेस एनएबीएल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोविड तपासणी सुविधा सुरू करण्यासाठी  हिरवा कंदील मिळाला आहे.

या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या “आरटीपीसीआर कोविड तपासणी प्रयोगशाळा फक्त पुणे आणि मुंबईला उपलब्ध आहेत. त्यामुळे तपासणी रिपोर्ट येण्यासाठी २४ तासांचा अवधी लागत होता. आता ही प्रयोगशाळा मावळमध्ये उपलब्ध झाली आहे.

प्रयोगशाळेतील अत्याधुनिक यंत्रणेमुळे कमी वेळेत कोविडचे निदान होईल. त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार मिळेल. तसेच, कोविडमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळेल. अतिशय महाग ही तपासणी डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रूग्णालयात ९०० रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात ाली आहे. यामुळे मावळ भागातील जनतेची मोठी सोय झाली आहे. त्याच प्रमाणे इेतर रूग्णालयांनाही तत्पर रूग्णसेवा मिळण्यास मोठी मदत होईल.”

प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता म्हणाले,“ कोविड पासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त जेष्ठ नागरिक आणि सहरुग्णता असणारांनी कोविड लसीकरण करून घ्यावे. सर्वांनी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर या त्रिसूचीचा अवलंब करावा .त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होईल.”

एनएबीएल प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास व कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास यांनी विषाणू तपसणी प्रयोगशाळा प्रमुख संध्या कुलकर्णी, डॉ. साधना चाटे, डॉ. गौरी यादव व सहकार्‍यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *