Chikhali news: शिवजयंतीनिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर

Pckhabar- श्री क्षेत्र टाळगांव चिखली येथे एक गाव एक शिवजयंती उत्सव यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा झाला. दरवर्षीच्या मोठ्या कार्यक्रमास फाटा देत , समाजोपयोगी उपक्रमावर भर देण्यात आला होता.
याचाच एक भाग म्हणून चिखली येथील छत्रपती शिवाजी माराज चौकात महारक्तदान शिबिर , मधुमेह तपासणी व स्त्रीरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबीराचे उद्घाटन केले.
पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले कोरोनामुळे आज हॉस्पीटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा वेळेस नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांस योग्यवेळी रक्त मिळाल्यास जीवनदान मिळू शकते. यासाठी तरूंणानी उत्स्फूर्तपणे ऱक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले. चिखलीच्या एक गाव एक शिवजयंती उपक्रमांचा आदर्श इतर मंडळांनी घ्यायला हवा असे ते म्हणाले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे , पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख , नगरसेवक राहुल जाधव , कुंदन गायकवाड , अकुंश मळेकर , स्विकृत सदस्य दिनेश यादव , संतोष मोरे , सरिता नेवाळे , अँडव्होकेट वर्षाताई मोरे , जितेंद्र यादव , विकास साने , निलेश लोखंडे , गीताराम मोरे ,अमृत सोनवणे , काळुराम यादव , विक्रम मोरे , विष्णु भुजबळ आदि ग्रामस्थ उपस्थित होते . त्यावेळी एक गाव एक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
अनेक नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर स्त्रीरोग तपासणी शिबीरास महिलांचा प्रतिसाद उत्तम मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शशिकांत पुंड यांनी तर आभार शिवाजी अंबिके यांनी मानले.










Leave a Reply