Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 892 नवे रूग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 892 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. मंळवारी शहरात 1 हजार 837 तर हद्दीबाहेरील 55 असे 1892  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 420 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 37 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 18 हजार 912 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 988  तर हद्दीबाहेरील 834 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 4 हजार 174 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 190 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 3 हजार 112 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 351 घरांना भेटी देऊन 4 हजार 212 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरात मेजर कन्टेंन्मेंट झोन 214 तर मायक्रो झोन 1251 घोषित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *